स्वतःमध्ये गुंतवणूक कशी करावी ? वॉरेन बफेट यांनी स्वतःमध्ये गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक म्हटली आहे. तर स्वतःमध्ये आपण कशाप्रकारे गुंतवणूक करू शकतो ? हे या लेखात पाहूया.
स्वतःमध्ये गुंतवणूक कशी करावी ?
जर माणसाचे वैयक्तिक जीवन पाहिले तर माझ्या मते खालील गोष्टी माणसासाठी महत्त्वाच्या आहेत.
- प्रेम
- शांती
- आरोग्य
- पैसा
- मुक्तता आणि स्वातंत्र्य
- ज्ञान
प्रेम
आपल्या जीवनात प्रेम वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो ?
प्रेम करणे आणि होणे. या दोन्ही गोष्टी आपल्याला जीवनात हव्या असतात. आपल्याला प्रेम हवेही असते आणि आपल्याला प्रेम द्यायचेही असते. मग आपण स्वतः मध्ये अशी काय गुंतवणूक करू शकतो की आपल्या जीवनातील प्रेम वाढेल ?
प्रेम हा भावनिक विषय आहे, दुसऱ्याला समजून घेण्याचा विषय आहे. दुसऱ्याला समजून घेताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे वेळ. जर तुमच्याकडे जीवनात दुसऱ्याला समजून घ्यायला वेळ नसेल तर तुमच्याकडे प्रेमासाठी जीवनात वेळ नसेल. तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करू शकता ती इतरांना समजून घेण्यासाठी मोकळा वेळ काढण्याची. समजून घ्यायला वेळ काढला तर जीवनात प्रेमही वाढेल.
कोणते नाते संपवावे ह्याचा निर्णय घ्यायलाही आपल्याला वेळ हवा असतो. जीवनात काही नाती संपवूूूनच जीवनातील प्रेम वाढतंं. पण नाती तोडायला हिम्मत लागते. आणि ती हिम्मत जमा करण्यासाठी आपल्याला वेळ हवा असतो. जेणेकरून पश्चाताप होईल असा निर्णय घ्यावा न लागेल. नाते संपवण्याची चालढकल करत चिंतेमध्ये जगण्यापेक्षा. चिंता सोडा सुखाने जगा.
शांती
परत वेळ. आपण सतत कशाच्या तरी मागे धावत राहिलो तर जीवनात शांती राहत नाही. उणीव असेल तिथे शांती नसेल. शांती समाधानात असते. आपण सर्वांनी महत्वाकांक्षी असणे आवश्यक आहे. पण महत्वाकांक्षा असताना शांती असते का ? शांती हवी असेल तर समाधान हवंच. रोज जीवनात असा काहीतरी वेळ असला पाहिजे जेव्हा आपण काही मिळवण्याच्या मागे धावणे सोडून, जे आहे त्याचा मनापासून आनंद घेतला पाहिजे.
तुलनेमुळे जीवनात शांती राहत नाही. तुलना तशी वाईट गोष्टही नाही. पण सतत तुलना करणे ही वाईट गोष्ट आहे.
गाडी चालविणे आणि आपले जीवन जगणे यात फार साधर्म्य आहे. कधी जास्त तुलना करून आपली गाडी रस्त्याच्या खाली जाते, तर कधी तुलना न करून आपण प्रगतीचे मार्ग बंद करतो आणि गाडी रस्त्यावरच थांबवतो.
गाडी चालवताना जसे ब्रेक, वेग, आरसा, हॉर्न, स्टेरिंग या प्रत्येक गोष्टीचे आपले वेगळे महत्त्व असते, तसेच जीवनात वेगवेगळ्या भावना यांचे महत्त्व असते. योग्य वेळी गाडीचा योग्य पार्ट नाही वापरला तर जसा अपघात होतो तसेच जीवनात योग्यवेळी योग्य भावना आपल्याकडे नसेल तर जीवनाचा अपघात होतो. म्हणजे कुठे कोणती गोष्ट कमी करायची, वाढवायची हे आपल्याला ठरवावे लागते. कधी वेग कमी करावा लागतो, तर कधी वाढवावा.
आरोग्य
इथेही वेळ. आरोग्याकरिता वेळ दिलाच पाहिजे. रोज फिरायला जाणे, व्यायाम, योगासन करणे आज वेळ वाया घालविणे वाटू शकते. पण दीर्घ अवधी याचा फायदा होणार नाही का ? आरोग्याबद्दल बरेच लोक लिहतात. आणि तुम्हालाही त्याबद्दल भरपूर माहिती आहे, म्हणून त्याविषयी जास्त लिहण्याची गरज नाही. आरोग्यात गुंतवणुकीचे फायदे आहेत हे तुम्हालाही माहीत आहे. तुम्हाला फक्त सवय नाही. सवय कशी लावावी हे तुम्ही Atomic Habits या लेखात शिकू शकता.
पैसा
तुम्ही आपल्या ब्लॉगचे नियमित वाचक आहात. पैशांबद्दल आपल्या ब्लॉग आपण बरेच काही लिहले आहे, तुम्ही ते त्या लेखांमध्ये वाचू शकता.
मुक्तता आणि स्वातंत्र्य
जे योग्य वाटत ते करण्याचं स्वातंत्र्य आणि मुक्तता, मुक्तता आपल्या दोषांपासून. तुम्ही किती मिळवू शकतो हे मर्यादित आहे. ही गोष्ट तुम्हालाही माहीत आहे आणि त्या मोटिवेशनल गुरुलाही, जो तुम्हाला सांगतो की तुम्ही जीवनात काहीही मिळवू शकता. लोभापासून मुक्तता मिळाली नाही तर जीवनात शांती राहणार नाही.
लोभ, मत्सर या सारख्या नकारात्मक गोष्टींमधून मुक्तता मिळणेही आवश्यक आहे.
तडजोड आपले स्वातंत्र्य हिरावून घेते. म्हणून जीवनात किती तडजोड करावी ? कशासाठी करावी ? हा विचार करायला आपण वेळ दिला पाहिजे. मी नोकरीत किती तडजोड करतोय ? का करतोय ? करायला हवी का ? मी नात्यात किती तडजोड करतोय ? का करतोय ? करायला हवी का ? हे प्रश्न विचारायला आपल्याकडे जीवनात वेळ असला पाहिजे.
स्वातंत्र्याशिवाय सर्व काही व्यर्थ आहे.
ज्ञान
लजो व्यक्ती बोलतो मला सर्व माहीत आहे, त्याची प्रगती कशी होईल ? सुधारणा करायला शिकणे आवश्यक आहे. नवीन गोष्टी शिकण्यास आपण किती वेळ देतो ? ज्ञानाशिवाय प्रगती नाही. ज्ञान मिळवण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे वाचन, पण कथा कादंबरी वाचण्यापेक्षा वास्तविक पुस्तके वाचणे जास्त फायद्याचे ठरते. सध्याच्या जगात ज्ञान मिळवण्याचे अनेक पर्याय आहेत जसे की Google, Youtube आणि Udemy. Udemy वर सर्व प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. तिथे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शिकू शकता.
वरील गोष्टीवरून तुम्हाला दिसून येईल की, स्वतःमध्ये गुंतवणूक ही तुम्ही तुमचा वेळ कसा वापरता ह्यावरच अवलंबून आहे. गुंतवण्यासारखी एकच गोष्ट आपल्याकडे आहे, आणि ती म्हणजे वेळ. आपले लक्ष कुठे आहे ? आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो ? यावरूनच आपण कुठे गुंतवणूक करू हे ठरत.
पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
This article is helpful for re-thinking and analysis of time investment.
Thank you. Please subscribe to email alerts.
Great writing. Jitka bolele titka kami padel aprtim lekh sarvch. Hats off.
धन्यवाद, कृपया ई-मेल अलर्ट ला subscribe करा, जेणेकरून पुढील लेखाचा अलर्ट येईल.