स्वतःला कसे जाणून घ्यावे ? स्वतःला का जाणून घ्यावे ?

स्वतःला कसे जाणून घ्यावे ? हे आपण या लेखात पाहू. पण त्या आधी प्रश्न आपल्या मनात येतो की,

स्वतःला का जाणून घ्यावे ?

यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. कोणाला जास्तीत जास्त पैसे मिळविणे यश वाटतं, कोणाला जास्तीत जास्त प्रसिद्धी, तर कोणाला जास्तीत जास्त स्त्रिया. काही लोक असेही असतात ज्यांना समतोल साधणे यश वाटतं. म्हणून प्रत्येकासाठी यश वेगवेगळे आहे.

जास्त पैसा हवा असणाऱ्या व्यक्तीला प्रसिद्धीचे महत्व नसेल. प्रसिद्धी हवा असणाऱ्या व्यक्तीला पैशाचे जास्त महत्व नसेल. जरी पैशाने प्रसिद्धी आणि प्रसिद्धीने पैसा मिळवता येतो, तरीही.

आपल्याला जीवनात जे हवं ते मिळालं तरच आपल्याला समाधान वाटत. कधी कधी जे हवं ते मिळूनही समाधान मिळत नाही. कारण बहुतेक वेळा आपल्याला काय हवं आहे हेच आपल्याला माहीत नसतं. इतर वेळा आपण बदलतो वा परिस्थिती बदलते.

मग जर जीवनात तुम्हाला काय हवे आहे ? जाणून घ्यायचे असेल तर स्वतःला जाणून घेणे आवश्यक आहे.

स्वतःला जाणणारे लोक त्यांच्या भावनांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो हे जाणतात.

Harvard Business Review Self Awareness

Open Demat Account

स्वतःला कसे जाणून घ्यावे ?

“तीन गोष्टी अत्यंत कठीण आहेत: स्टील, हिरा आणि स्वतःला जाणून घेणे.”

The Invisible Gorilla

Know Thyself

Plato

जे लोक स्वतःला जाणतात आणि जे लोक स्वतःला जाणत नाहीत, यांमध्ये सर्वात मुख्य फरक आहे तो वेळ. स्वतःला जाणणारे लोक स्वतःला जाणण्यासाठी वेळ खर्च करतात. स्वतःला न जाणणारे लोक फार व्यस्त असतात. त्यांना स्वतःला जाणून घ्यायलाही वेळ नसतो. म्हणून स्वतःला जाणून घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ.

मोबाईल मुळे आजकाल आपल्या जीवनात स्वतः करिता वेळ उरला नाही आहे. थोडा कंटाळा आला का लगेच आपण आपला फोन बाहेर काढतो. आधी कंटाळा यायचा तो वेळ आपण स्वतःकरिता द्यायचो. आपण आपल्या जीवनाबद्दल विचार करायचो. मी काय बदलू शकतो ? वेगळे करू शकतो ? माझे काय चुकत आहे ? बायकोच्या काय अपेक्षा आहेत ? आई वडिलांच्या काय अपेक्षा आहेत ? मुलांच्या जीवनात काय सुरू आहे ? त्यांना काही वाईट सवयी लागत आहेत का ? ह्या सर्वांबद्दल विचार करण्यासाठी आपल्याकडे आता वेळ उरत नाही, कारण मोबाईल.

कदाचित आपल्याला या प्रश्नांचा सामना करण्याची भीती वाटते. म्हणूनच आपण मोबाईलवर नको असलेल्या गोष्टींमध्ये रस घेत राहतो. कॉमेडी विडिओ पाहत राहतो. आपण अशा जगात राहतोय जिथे भरपूर माहिती उपलब्ध आहे. आपल्याला असे वाटते ज्याला जास्त माहिती असेल तो जिंकेल.

“मला जीवनात खरोखर काय पाहिजे आहे?”

Insight

ध्यान

ध्यान, काही लोकांचे म्हणणे असते आम्हाला ध्यान जमत नाही. आमच्या मनात बरेच विचार येत राहतात, शांती मिळत नाही. ध्यानातून लक्ष विचलित होत.

ध्यानाचा हा अर्थ नाही की तुमच्या डोक्यात काहीच विचार यायला नको. शांतीचा हा अर्थ नाही डोक्यात काहीच विचार येणार नाही. नदी किंवा समुद्र शांत वाटतो म्हणजे त्यात पाणी वाहत नाही, असे नसतं. तसंच ध्यानाच आहे. विचारशून्यता म्हणजे ध्यान नाही. तर ध्यान करताना जे विचार येतात, त्यांचा तुम्हाला फरक न पडणे, जे विचार मनात येतात त्यांना जुळून न राहणं म्हणजे ध्यान. विचार येतात तर येऊ द्या, तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका.

ध्यान करण्याचा मूळ उद्देश विचारशून्यता नसून जीवनाचा वेग कमी करणे आहे. आपण जीवनात जे धावत सुटलो आहे, त्यात आपण योग्य मार्गावर आहोत का ? हा विचार करण्याचा अवधी ध्यान आहे. ध्यान म्हणजे आपल्या मनात उर्वरित असलेल्या प्रश्नांची भेट. त्यांचे उत्तर मिळो ना मिळो, पण त्या प्रश्नांना भेटणे, त्यांना दुर्लक्षित न करणे म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे आपल्या भावना समजून घेणे. आपल्या क्रियांवर होणाऱ्या आपल्या ध्यानाचा परिणाम समजून घेणे.

Open Demat Account

मूल्ये

तुमची मूल्ये काय ? म्हणजे जीवनात तुम्ही काय करणार नाही ? आणि काय कराल याची नियमावली. प्रत्येक गोष्टीसाठी आपण नियम बनवू शकत नाही. पण काहीतरी गोष्टी तुमच्या जीवनात असतील ना, ज्या तुम्हाला माहीत आहे तुम्ही करणार नाही ?

मी कधी चोरी करेल का ? माझ्या बायकोला फसवेल का ? मी कोणाचा खून करेल का ? कोणत्या मार्गाने मला यश नकोय ? कोणतं यश मला नकोय ? कोणतं अपयश मला चालेल ? मी व्यसनांच्या अधीन जाईल का ? यासारख्या बऱ्याच प्रश्नांच्या उत्तरात आपल्याला आपली मूल्ये सापडतात.

तुम्हाला जीवनात काय महत्वाचे आहे, हे माहीत हवं. तेव्हाच कशाला प्राधान्य द्यायचे हे तुम्हाला कळेल. तसेच कशाचा त्याग करावा हेही कळेल. मी काय करणार आणि काय करणार नाही, किंवा मी काय आणि कधी करेल हे जाणणे म्हणजे तुमची मूल्ये जाणणे.

जीवनात नोकरीला प्राधान्य द्यावे का कुटुंबाला, ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे हे माहीत पाहिजे. तेव्हाच तुम्ही ठाम निर्णय घेऊ शकाल आणि तुम्हाला पश्चाताप होणार नाही.

नवीन गोष्टी करणे

नवीन गोष्टी करून आपण नवीन काहीतरी शिकतो. तुम्हाला कोणती गोष्ट इतरांच्या तुलनेत चांगली जमते, हे ती गोष्ट केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. जो व्यक्ती जीवनभर कधीच पोहला नाही, त्याला तो किती चांगला पोहणारा आहे हे कसे कळेल? तुम्ही ज्या गोष्टीत जगज्जेता आहात ती न करताच तुम्ही मेलात तर ?

नवीन गोष्टी करूनच आपण स्वतःला आणखी चांगल्या प्रकारे ओळखतो. आपल्या क्षमतांना आपण आव्हान देतो. म्हणून प्रत्येक गोष्ट अर्ध्यात सोडून नेहमी काहीतरी नवीन काहीतरी करण्याच्या फंदात पडू नका. लक्षात ठेवा, एक ना धड भाराभर चिंध्या. पण नवीन छोटे प्रयोग करणे आवश्यक आहे.

पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

इतर लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

माझे काम आवडत असेल व मी ते आणखी चांगल्या प्रकारे करावे ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला मदत करू शकता. खाली दिलेल्या देणगी च्या बटन वर क्लीक करून तुम्ही मदत करू शकता.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.